उल्लू अँपचा लोकप्रिय स्ट्रीमिंग मंच पुन्हा एकदा त्यांच्या नवीन वेबसिरीज '#MeToo वूल्फ ऑफ बॉलीवूड ' समवेत दर्शकांचे मनोरंजन करण्यास सज्ज झाला आहे. #MeToo वूल्फ ऑफ बॉलीवूड ही निःस्वार्थ, अनिर्णीत प्रेम आणि जगभरातील लाखो लोकांना आकर्षित करणाऱ्या ह्या चमकदार जगाबद्दलची सत्यता उलघडणारी कथा आहे.
फाल्गुनी शाह यांच्या ड्रिमझ इमेज स्टुडिओच्या सहकार्याने निर्माता-फिल्म निर्माते-उद्योजक विभू अग्रवाल यांच्या उल्लू अँपच हे नवीन सादरीकरण आहे. #MeToo वूल्फ ऑफ बॉलीवूड नामक या नवीन वेबसिरीस च दिग्दर्शन केले आहे दीपक पांडे यांनी.
एक असा क्षण ज्याने देशात खळबळ निर्माण केली होती, #MeToo वूल्फ ऑफ बॉलीवूड हि कथा करण माथूर नावाच्या व्यक्तीच्या आसपास फिरते. करण माथूर हा एका अज्ञात नवोदित तारका सुर्वणा पाष्टे उर्फ सना हिच्या मृत्यूला स्वतःला जवाबदार मानत असतो. सुर्वणा पाष्टे उर्फ सना जी करणला तिच्यावर घडलेल्या लैंगिक शोषणाचे सत्य सांगण्यापूर्वी स्वत: चे जीवन संपवते. अवंतिका शर्मा ज्या शहरातील प्रभावशाली सोशियलाईट्स असतात त्यांचा विवाह मोडतो जेव्हा करण, सनाच्या आत्महत्येचा सूड घेण्याचा निर्णय घेतो. तथापि, एक मोठा प्रश्न असा आहे की एक गणना करणाऱ्या, तीक्ष्ण गुंतवणूकी बँकरने आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनास का धोक्यात आणले, जो त्या मुलीच्या मित्र परिवाराचा केवळ एक भाग होता. एखाद्या चित्रपटात रोल मिळावा ह्या उद्देशाने लबाड निर्मात्याच्या कार्यालयात मुलीद्वारे स्ट्रिपज् करण्यापासून कार्यशाळेत कलेच्या नावावर घडत असलेले अन्य प्रकार लैंगिक शोषणापर्यंतच्या सगळ्या घटना ह्या वेबसिरीत दाखवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. करण शर्मा यांनी दारू आणि अन्य मादक पदार्थांचा समावेश असलेल्या ग्लॅमरस पार्टीत सहभाग घेऊन सनावर केल्या अन्यायाच्या दोषीला पकडण्याचा प्रयन्त करतो. त्यासाठी ते सनाच्या गुनाहगारांद्वारे स्वतःच पकडले जायचे, तुरुंगात जाण्याचे आणि करण्याजोगी जोखीम जीवावर घेतो.
उल्लूच्या च्या #MetToo वुल्फ ऑफ बॉलीवूड ह्या वेबसिरीत 'दंगल' आणि 'जुडवा २' फेम विवान भाथेना, 'दो दिल एक जान' फेम अभिनेत्री रिधिमा तिवारी, अभिनेत्री -नृत्यांगना एना लमी, अभिनेत्री-मॉडेल अनन्या भंडारी, मिस आशिया बिकिनी गेहना वसिष्ठ, टीव्ही धारावाहिक 'कसौटी जिंदगी की' प्रसिद्धीप्राप्त सिकंदर खरबंदा, वरिष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर, अमित बेहल, 'स्प्लिट्सव्हिला' धारावाहिक आणि 'कुंडली भाग्य' प्रसिद्धीप्राप्त ईशा आनंद शर्मा यांचा ह्या कथेच्या कास्ट मध्ये समावेश आहे. ह्या वेबसिरीजच्या अनावरणावेळी विभूअग्रवाल आणि अभिनेता अमित बहेल यांनीही आपली उपस्थिती दर्शविली.
'हलाला' आणि 'पांचाली' यांच्या प्रचंड सकारात्मक प्रतिसादानंतर आणि पुन्हा एकदा एक नवीन #MeToo वुल्फ ऑफ बॉलीवूड नामक कथा घेवून आलो आहोत. आजच्या काळातील लोक हुशार आहेत. त्यांनी सामग्रीशी संबंधित गोष्टी समजून घेण्यास प्रारंभ केला आहे. उलू अँप च्या कथा ह्या आधुनिक विचार प्रक्रिया आणि आजच्या लोकांशी संवाद कसा साधला जाईल त्यानुसार केल्या जातात," उल्लू अँप चे सर्वेसर्वा विभू अग्रवाल म्हणाले.
उल्लूद्वारे, दर्शक मूळ आणि सिंडिकेटेड सामग्री २४ तासांमध्ये कोठेही कुठूनही पाहू शकतात. उल्लूच्या ओरिजनल सामग्री लायब्ररीमध्ये ओरिजनल फ़ीचर फिल्म्स, लघुपट, डॉक्यूमेन्ट्री, बहुभाषिक सामग्री, गाणी, ऑडिओ सूची इ. उपलब्ध आहेत. उल्लूची विशेषता अशी आहे की त्यांची व्हिडिओ सामग्री डाउनलोड करून कोणत्याही इंटरनेट कनेक्शनशिवाय ती पाहिली जाऊ शकते. उल्लू अॅप्स iOS मधील अॅप स्टोअरमध्ये आणि Android वर Google Play Store वर उपलब्ध आहेत