Thursday, 26 September 2019

’रीना नाईक यांच्या आगळ्या-वेगळ्या कलेचे प्रदर्शन'


माजी पुरस्कारप्राप्त एचआर प्रोफेशनल रीना नाईक यांचे ब्रास इंप्रेशन्स, चौदा नितांत वास्तविकतेवर आधारित पेंटिंग्स, देवाच्या पितळ शिल्पांचे कॅनव्हासवर ऑइल पेंटने रेखाटलेल्या चित्रांचे पहिले-वहिले प्रदर्शन दिनांक २४ सप्टेंबर  रोजी मुंबईच्या प्रख्यात नेहरू सेंटर आर्ट गॅलरी येथे आयोजित करण्यात आले होत. ह्या प्रदर्शनास ज्येष्ठ शास्त्रीय संगीतकार तौफिक कुरैशी प्रमुख पाहुणे म्हणून तसेच भरत दाभोलकर, गायिका मधुश्री, रॉबी बादल,अर्झन खंबाट्टा,अभिनेत्री रेहा खान, ऑडिओलॉजिस्ट -स्पीच थेरपिस्ट देवांगी दलाल, अनुशा श्रीनिवासन अय्यर, गीतिका वर्दे  कुरेशी,अमेया नाईक,  गौतम पाटोळे, अमर संघम यावेळी उपस्थित होते. या प्रदर्शनास  जोश फाउंडेशनच्या दिव्यांग मुलांनी ही आपली उपस्थिती दर्शवली. 30 सप्टेंबरपर्यंत इतर कलाप्रेमीना अनुभवन्याची संधी असेल.

पितळाचा रंग हा नेहमीच कलाकार रीना नाईक ह्यांना उत्साही करत आला आहे ह्या कारणावश त्या ह्या कलेकडे झुकल्या गेल्या. रीना नाईक यांनी घडविलेल्या १४ सुंदर अश्या कलाकृती ज्या देवत्व चा घटकवर्ण मांडतात, त्या  पितळेचे संस्कार आपल्या अंतःकरणावर अमिट छाप सोडण्याचे वचन देतात. बासरी वाजविणारा श्री कृष्ण, कलिंगा सापावरिल किशोर वयातील गोविंदा, शंखामध्ये विराजमान गणपती बाप्पा, गुलाबाच्या पाकळ्यांद्वारे अर्पिलेली भक्ती एक अविस्मरणीय नमुना बजावतात. ह्या कलाकृती पाहता रीना नाईक यांच्या कलेतून कॅनव्हासवर जणू काही देवचं जीवित होत असल्याचा भास होतो.


रीना मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून आर्टदेश फाउंडेशनबरोबर काम करत आहेत आणि कलाकारांना प्रोत्साहन आणि कलेचा वारसा पुढे नेत आहेत. त्या कला विकासाच्या सरकारी प्रकल्पांमध्ये एक प्रमुख भूमिका बजवतात. स्वतःच्या अंतःकरणाचे अनुसरण करून आपल्या आवडीला आपला व्यवसाय  बनवणाऱ्या रीना नाईक म्हणतात की, “मला पितळाचा रंग आणि आरास खूप आवडते. पितळ हा एक पवित्र धातू आहे आणि त्याचे ठसे कायमचे उमटतात. आपण ज्या देवतांची मनोभावे उपासना करतो त्यांचीचं यथार्थवादी छाप आपल्याला या चित्रांतून दिसून येते."

ऑइल पेंट्सद्वारे कॅनव्हासवर कमालीची यथार्थवादाची शैली सहजपणे निर्माण करणाऱ्या रीना म्हणाल्या की, "ही प्रक्रिया सोपी आहे.  पेन्सिल न वापरता  मी फक्त ब्रश एका रिक्त कॅनव्हासवर वापरते.”  त्या फक्त सर्वशक्तिमानाने पूजत असलेल्या प्रतिभेचा शोध घेत आहेत असे त्यांना वाटते. यासंदर्भी त्या सांगतात की, “मी फक्त सकारात्मक उर्जा माझ्याद्वारे वाहू देते आणि तीच कॅनव्हासवर उमटते. तपशीलांवर अवलंबून, एखादी कलाकृती पूर्ण करण्यास पंधरा दिवसांपासून ते महिन्यापर्यंतचा कालावधी लागतो."

हे सर्व जितके सोपे सुंदर दिसते आहे तितकेच रीना साठी ते सोपे नव्हते! एका अपघातामुळे, त्यांना कार्पल टर्लन सिंड्रोम ह्या रोगास सामोरे जावे लागले आणि डॉक्टरांनी त्यांना त्यांचा उजवा हात न वापरण्यास सांगितले. या अपघाताबद्दल सांगताना त्या म्हणतात की, “जेव्हा डॉक्टरांनी मला हे सांगितले तेव्हा मला वाटले की, कला क्षेत्रात माझी कारकीर्द सुरू होण्यापूर्वीच संपली आहे. काही महिन्यांच्या थेरपीनंतर, मी बरी झाले आणि पुन्हा एक नवीन सुरुवात केली.” तब्येत खराब असतानाही आणि वारंवार इस्पितळात दाखल व्हावे लागत असुनही रीना यांनी त्यांच्या सध्याच्या प्रदर्शनासाठी पंधरापैकी चौदा कलाकृतीं पूर्ण केल्या आहेत.

जिद्द आणि चिकाटीने प्रत्येक संकटावर मात करता येऊ शकते याचे आणखीन एक नवीन उदाहरण बनणाऱ्या रीना नाईक यांच्या प्रदर्शनास भेट देने म्हणजे नक्कीच एक योग्य वेळ घालवण्याची निवड असेल.

No comments:

Post a Comment