Saturday, 28 September 2019

जागतिक बधिर दिनाच्या निमित्ताने जोश फाऊंडेशन आणि मिठीबाई विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची एकता आणि सामाजिक समानता दर्शवणारी मानवीय साखळी


डॉ. जयंत गांधी व ऑडिओलॉजिस्ट-स्पीच थेरपिस्ट देवांगी दलाल यांची जोश फाऊंडेशन ही स्वयंसेवी संस्था आणि  क्षितिज, एसव्हीकेएमच्या मिठीबाई कॉलेजचं आंतरराष्ट्रीय इंटरकॉलेजिएट कल्चरल फेस्टिव्हल दिव्यांगांसाठी आयोजित उपक्रमासाठी एकत्र आले. हा उपक्रम 'जागतिक बधिर दिना' च्या निमित्ताने आयोजित केला गेला होता. एकता आणि सामाजिक समानता दर्शवण्यासाठी सामान्य आणि जोश फॉउंडेशनच्या  विद्यार्थ्यांनी हातात हात धरून एक मानवी साखळी तयार केली होती. प्रसंगी अभिनेता जॉनी लीव्हर आणि रोहित रॉय यांनी उपस्थित राहून या कार्यक्रमास आपला पाठिंबा दर्शविला.


विलेपार्ले येथील जशोदा रंग मंदिर येथे देवांगी दलाल आणि जोश फाऊंडेशनच्या टीमने १० लाख मूल्याचे श्रवणयंत्रे मुलांना दान केले. या कार्यक्रमामध्ये  ४०० हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग होता, ज्यामध्ये संपूर्ण मुंबईतील बधिरांसाठी विविध शाळांमधील १५० हून अधिक मुले एकत्रित आली होती. श्रवणविषयक अशक्तपणा अशा स्थितीस संदर्भित करते जे लोक ऐकण्यास आंशिक किंवा संपूर्ण असमर्थ असतात. भारतात कर्णबधिरतेचे  प्रमाण बर्‍यापैकी लक्षणीय आहे आणि सध्या सुमारे २० लाख मुले दररोज याला सामोरे जात आहेत.

अश्या ह्या उपक्रमाला अजून सामर्थ्य मिळो.

No comments:

Post a Comment